Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी फार्मर आयडी

परभणीतील रस्ता अडविल्यास फार्मर आयडी होणार पाच वर्षासाठी रद्द

Parbhani Farmer ID:


परभणीतील रस्ता अडविल्यास फार्मर आयडी होणार पाच वर्षासाठी रद्द

Parbhani Farmer ID |

 

अतिक्रमणामुळे शेती कामात अडथळे शासकीय योजना,मदतीस अपात्र ठरविण्याची कार्यवाही

परभणी (Parbhani Farmer ID) : तहसिल अंतर्गत गाव नकाशावर दर्शविण्यात आलेले तसेच शासकीय जागेतील शेत रस्ते, सार्वजनिक रस्ते यावर काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अतिक्रमणामुळे शेतकर्‍यांच्या ये - जा करण्याच्या हक्कावर परिणाम होत असून शेती कामात अडथळे निर्माण होत आहेत. रस्ता अडविल्यास फार्मर आयडी पाच वर्षासाठी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या बाबत तहसिलदार डॉ. संदीप राजापूरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

अतिक्रमण धारकांना तहसिल कार्यालया मार्फत अतिक्रमण सात दिवसाच्या स्वखर्चाने काढून टाण्याची नोटीस देणार आहे. निर्धारित मुदतीत अतिक्रमण काढून न घेतल्यास शासनस्तरावरुन महसूल विभागामार्फत अतिक्रमण काढले जाणार आहे. या कारवाईसाठी होणारा खर्च संबंधित अतिक्रमण धारकाकडून नियमानुसार वसूल करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या ये - जा करण्याचा हक्क आणि अशा रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत पीक लागवड करणे, रस्ता अडविणे, रस्त्याचा वापर रोखणे, कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरले जाणारनाही. शेत रस्त्याचे नुकसान, रस्ता बुजविणे, अतिक्रमण करणे अथवा सार्वजनिक वापरात अडथळा निर्माण करणार्‍या संबंधित व्यक्ती विरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे.

या शिवाय अशा व्यक्तींचे आधार कार्ड, फार्मर आयडी पाच वर्षासाठी ब्लॉक करण्याची तसेच शासकीय योजनांचा लाभ, मदत मिळण्यास अपात्र ठरण्याची कारवाई सक्षम प्राधिकार्‍यां मार्फत करण्यात येऊ शकते. शेतकरी व नागरीकांनी गाव नकाशावरील तसेच कायदेशीररित्या अस्तित्वात असलेल्या शेत रस्त्यांवर कोणतेही अतिक्रमण करु नये. ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे ते स्वयंस्फुर्तीने तात्काळ काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Meeting