Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी सिंगल यूज प्लास्टीक

परभणीत सिंगल यूज प्लास्टीकचा वापर; व्यापार्‍यांना दंड

Parbhani Plastic Ban: परभणी महापालिकेच्या पथकाने जुन्या मोंढ्यात सिंगल यूज प्लास्टीक वाहतूकपासून प्रतिबंध करण्याच्या मोहिमेत भाग घेऊन तपासणी करीत आले.


परभणीत सिंगल यूज प्लास्टीकचा वापर व्यापार्‍यांना दंड

Parbhani Plastic Ban |

 

परभणी महापालिकेची मोहिम ५५ किलो प्लास्टीक जप्त

परभणी (Parbhani Plastic Ban) : सिंगल यूज प्लास्टीक वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर शहर महापालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. जुना मोंढा परिसरात गेलेल्या तपासणीत तीन दुकानांना २५ हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच  ५५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार २ जुलै रोजी जुना मोंढा परिसरात सिंगल यूज प्लास्टीक विरोधात विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, विनय ठाकूर, तुराब खान, न्यायरत्न घुगे, राजू झोडपे, सौरभ सुर्यवंशी यांच्या पथकाने सहभाग घेतला. सदर पथकाने ३७ दुकानांची तपासणी केली. यामध्ये तीन दुकानात सिंगल यूज प्लास्टीक आढळून आले.

यापैकी दोन दुकानांवर यापूर्वीही कारवाई झाली होती. त्यामुळे त्यांना प्रत्येकी दहा हजाराचा दंड आकारण्यात आला. तसेच दुसर्‍या एका दुकानदाराला पाच हजाराचा दंड लावण्यात आला. (Parbhani Plastic Ban) मोहिमेत एकूण २५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये पथकाने ५५ किलो सिंगल यूज प्लास्टीक, पाणी पाऊचचे अकरा पोते, खुले पाणी पाऊच जप्त केले आहेत. या मोहिमेत प्रभाग समिती ब च्या कर्मचार्‍यांनीही सहभाग घेतला.