Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत जिंतूर येथील कुरेशी खून प्रकरणात एकास जन्मठेप....!

परभणीतील जिंतूर येथे पैशांच्या व्यवहारातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे.


परभणीत जिंतूर येथील कुरेशी खून प्रकरणात एकास जन्मठेप

Parbhani Case |

सहआरोपीला १४ वर्षांची सक्त मजुरी जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

परभणी (Parbhani Case) : परभणीतील जिंतूर येथे पैशांच्या व्यवहारातून झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल ७ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तय्यब कुरेशी खाजा कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ मे २०२४ रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा शगननुर हा नॅशनल उर्दू शाळेजवळ असताना आरोपी अलीम कुरेशी मुसा कुरेशी व अमजत सरवर कुरेशी यांनी पैशांच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये अमजत कुरेशी याने शगननुरचे हात पकडून ठेवले, तर अलीम कुरेशी याने चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत सगननूर याला प्रथम जिंतूर ग्रामीण रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जे. सय्यद यांनी करून आरोपींना अटक केली. घटनास्थळ पंचनामा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, जप्त चाकूवरील वैद्यकीय अभिप्राय आदी पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन. आर.नाईकवाडे यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्पेâ अ‍ॅड.आनंद गिराम यांनी बाजू मांडत एकूण ९ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच व वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साक्षी महत्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अलीम कुरेशी मुसा कुरेशी (वय २८) यास जन्मठेप व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

तसेच सहआरोपी अमजत सरवर कुरेशी (वय २४) यास खून करण्यास मदत व उत्तेजन दिल्याबद्दल दोषी ठरवत १४ वर्षांची सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. आनंद गिराम यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलिस अंमलदार आकाश रेड्डी, मपोह. वंदना आदोडे, पोह.सय्यद रहीम यांनी काम पाहिले.

Related to this topic: