Legislative Council Election: परभणीला गेतेवारी मतदान साठी शिवसेनेच्या उमेदवारी डॉ. विवेक नावंदर व अपक्ष उमेदवारी सुशिल देशमुख यांच्याशी भेट न झाल्यामुळे मतदारांना धक्का लागला.
हिंगोली (Legislative Council Election) : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीचा दिवस येऊन ठेपला असला तरी शिवसेना उबाठा व अपक्ष उमेदवाराची ‘भेट’ न झाल्याने मतदार प्रतिक्षेत असल्याचे बुधवारी दिसून आले.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी गुरुवार १८ जून रोजी मतदान होणार आहे. या पूर्वी महायुतीतर्पेâ शिवसेनेचे उमेदवार असलेल्या सईद खान यांनी मतदारांसहीत प्रमुख नेत्यांची ‘भेटगाठ’ घेण्याचा सोपस्कार पुर्ण केल्याचे समजते. दरम्यान (Legislative Council Election) महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर व अपक्ष उमेदवार सुशिल देशमुख यांची भेट न झाल्याने मतदार त्यांची प्रतिक्षा करीत असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात सईद खान यांनी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाच्या नगरसेवकांची व त्यांच्या नेत्यांची भेट घेतली.
या भेटीत उमेदवारातर्पेâ मतदारांना योग्य ‘मानपान’ मिळाल्याची चर्चाही होती. असाच ‘मानपान’ इतर दोन्ही उमेदवारांकडुन मिळेल, अशी अपेक्षा मतदारांना असताना बुधवारी सायंकाळ पर्यंत दोन्ही पैकी एकही उमेदवार या मतदारांच्या भेटीला आला नसल्याची खंत काही नगरसेवकांनी बोलुन दाखविली. बुधवारी रात्री या दोन उमेदवारांपैकी एखादा किंवा दोघे भेटीला येतील, असा अंदाज बांधुन मतदार प्रतिक्षा करीत असल्याचे चित्र आहे.