Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

परमपूज्य कॉन्व्हेंट निकाल

परमपूज्य कॉन्व्हेंट स्कूलची सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम...

Parampujya Convent Results: घोट येथील परमपूज्य कॉन्व्हेंट स्कूलने २०२६च्या माध्यमिक शालांत परीक्षेत सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.


परमपूज्य कॉन्व्हेंट स्कूलची सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Parampujya Convent Results |

 

सर्व १७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण

घोट (Parampujya Convent Results) : घोट येथील परमपूज्य कॉन्व्हेंट स्कूलने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेत सलग पाचव्या वर्षीदेखील १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या (Parampujya Convent Results) या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यंदा शाळेतील एकूण १७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विशेष बाब म्हणजे सर्वच्या सर्व १७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

इयत्ता दहावीमध्ये अनुश्री आनंद बाला व तन्वी राजेशम अंबीलपु यांनी प्रत्येकी ९०.२० टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच यश शुभंकर हलदार याने ८२.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर अर्पिता अश्वीन जयदार हिने ८१.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. याशिवाय (Parampujya Convent Results) आयुष केशव राठोड याने ७८.८० टक्के तर भूमी अमरिश बोष हिने ७८.६० टक्के गुण मिळवत विशेष यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य अशोक कांचा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष कांचा, रंजित खेडकर, शांताराम कुनघाडकर, शिवानी विश्वास, जयेद शेख यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related to this topic: