Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

पाणीपुरवठा आंदोलन

पाणीप्रश्नावर ग्रामस्थांचे उपोषण सुरू; पंचायत समितीसमोर आंदोलन

Water Supply Andolan: चिखलीतील मंगरूळ परिसरातील ग्रामस्थांनी प्रलंबित पाणीपुरवठा व विकासकामांच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. पाणीपुरवठ्यासाठी अपूर्ण कामे व तातडीने कारवाईची मागणी.


पाणीप्रश्नावर ग्रामस्थांचे उपोषण सुरू पंचायत समितीसमोर आंदोलन

Water Supply Andolan |

चिखली/ बुलढाणा (Water Supply Andolan) : तालुक्यातील मंगरूळ (खेडे) परिसरातील ग्रामस्थांनी प्रलंबित पाणीपुरवठा व विकासकामांच्या मागण्यांसाठी अखेर उपोषणाला सुरुवात केली आहे. आज सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती चिखली कार्यालयासमोर सुमारे १३ ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. गावातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनेक कामे अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. २०२० मध्ये खोदलेल्या विहिरी व बोरवेलचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

तसेच पाणीपुरवठ्यासाठी (Water Supply Andolan) आवश्यक वीज डीपी बसविण्याचा प्रश्न प्रलंबित असून, २०२१ मध्ये सुरू झालेल्या पाईपलाईनचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. संबंधित कामे तात्काळ पूर्ण करून गावाला सुरळीत पाणीपुरवठा करावा, ही उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, या (Water Supply Andolan) आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार तसेच इतर संबंधित विभागांना देण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. उपोषणाच्या ठिकाणी नायब तहसिलदार मुरलीधर गायकवाड  पाणीपुरवठा विभागाचे वाघमारे पंचायत समितीचे व्हिडिओ गजानन पोपळे चर्चा केली आता वूत्त पर्यंत तोडगा निवडू शकला नाही

Related to this topic: