Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

पांदन रस्ता अतिक्रमण

पांदन रस्त्यावरील अतिक्रमण हटवा; तहसीलदार यांना निवेदन

Pandan Road Encroachment: शामकी माता मंदिराजवळील पांदन रस्त्यावर शेतकर्यांचे अतिक्रमण झाले असल्याने त्याच्यावर नकार देत रस्ता बंद असल्यामुळे शेतात कार्यक्रम वेळेस होऊन नाही.


पांदन रस्त्यावरील अतिक्रमण हटवा तहसीलदार यांना निवेदन 

Pandan Road Encroachment |

मानोरा (Pandan Road Encroachment) : तालुक्यातील उमरी खुर्द येथील शामकी माता ते वाघामाय जुन्या पांदन रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता कायमस्वरूपी खुला करावा, अशी मागणीचे निवेदन तहसिलदार यांना शेतकरी राजेश बाबुराव राठोड यांच्यासह ७७ शेतकऱ्यांनी दिले आहे. 
 
निवेदनात कास्तकारांनी म्हटले आहे की, खरीप पेरणी हंगाम तोंडावर आला असताना पांदण रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शेती मशागतीच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. पेरणी हंगाम असल्यामुळे शामकी माता मंदिराजवळील दुकान व इतरांनी पांदन रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविल्याशिवाय कास्तकारांच्या पेरणीच्या कामात मोठा अडथळा येत आहे. शेत मशागतीसाठी ट्रॅक्टर, बैलजोडी व इतर अवजारे घेऊन जाण्यास रस्ता उपलब्ध नसल्याने पेरणी वेळेवर होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

कास्तकारांनी यापूर्वीही या प्रश्नासाठी पाठपुरावा केला आहे.  मात्र या दोन्ही अर्जांची अद्याप दखल घेण्यात आली नाही. पेरणी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. रस्ता बंद असल्याने वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे शामकी माता मंदिराजवळील अतिक्रमण त्वरित हटवून पांदन रस्ता कायमस्वरूपी खुला करावा," अशी मागणीचे निवेदन पिडित शेतकऱ्यांनी दिले आहे. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून अतिक्रमण हटवावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

शामकी माता मंदीर ते वाघमाय २ किलोमीटर पांदण रस्त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्त्याचे सन २० डिसेंबर २०२२ मधील यादीत नाव समावेश करण्यात आला आहे. मात्र अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावरील (Pandan Road Encroachment) अतिक्रमण हटवून रस्ता काम मार्गी लावून न्याय द्यावा!
-राजेश राठोड, शेतकरी उमरी खुर्द