Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Operation Mission Urja

हिंगोली: व्यसनमुक्ती ते सायबर सुरक्षा; ‘ऑपरेशन मिशन ऊर्जा’ने १० हजार विद्यार्थ्यांना जोडले

जनजागृती करणाऱ्या भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.


हिंगोली व्यसनमुक्ती ते सायबर सुरक्षा ‘ऑपरेशन मिशन ऊर्जा’ने १० हजार विद्यार्थ्यांना जोडले

Operation Mission Urja |

API प्रेमलता जगताप यांच्या कार्याचा गौरव; पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

हिंगोली : जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची सवय लावण्यापासून ते सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे यापर्यंत सर्वच विषयांवर एकाच व्यासपीठावरून जनजागृती करणाऱ्या भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन मिशन ऊर्जा’ ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या उपक्रमांतर्गत हिंगोलीत राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक शाळा आणि ५००० हून अधिक मुलांपर्यंत थेट संवाद साधला.

अंमली पदार्थांचे दुष्परिणाम काय आहेत, रस्त्यावर जाताना कोणते वाहतूक नियम पाळायचे आहेत, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते उपाय करता येतील आणि मोबाईल-इंटरनेटच्या जगात सायबर फसवणुकीपासून कसे सावध राहायचे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृतीला व्यापक रूप देण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी हिंगोलीत भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीसाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी शाळा, महाविद्यालये आणि विविध विभागांशी सातत्याने संपर्क साधून नियोजन केले.

त्यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील ३४ शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापकांसह सुमारे १०,००० विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

१३ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, तत्परता, जबाबदारी आणि प्रभावी समन्वयाचे कौतुक केले. प्रशस्तीपत्र देताना ते म्हणाले की, त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थी आणि समाजात अंमली पदार्थांविरोधात सकारात्मक दृष्टिकोन तसेच सुरक्षिततेची जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.

भविष्यातही अशाच प्रकारे पोलीस दलाचे नाव उंचावावे आणि समाजात जनजागृतीचे कार्य सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पोलिसी कामासोबतच समाज प्रबोधनाचे कामही तितक्याच प्रभावीपणे करता येते, याचे उदाहरण म्हणून हिंगोलीतील या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Related to this topic: