Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अधिकारी सुरेश कांबळे

महाअवास अभियानात उल्लेखनीय कामगिरी: सेनगावचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांचा साताऱ्यात गौरव

Officer Suresh Kamble: ग्रामीण विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे.


महाअवास अभियानात उल्लेखनीय कामगिरी सेनगावचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांचा साताऱ्यात गौरव

Officer Suresh Kamble |

सेनगाव (Officer Suresh Kamble) : ग्रामीण विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले आहे. माहूर येथे कार्यरत असताना त्यांनी महाअवास अभियान २०२३-२४ अंतर्गत राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि. १५ मे रोजी सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

महाअवास अभियानांतर्गत ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळवून देण्यासाठी सुरेश कांबळे (Officer Suresh Kamble) यांनी विशेष प्रयत्न केले होते. घरकुल मंजुरीपासून ते प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा, ग्रामपंचायतींशी समन्वय, लाभार्थ्यांचे प्रबोधन आणि योजनांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे माहूर पंचायत समितीने राज्यात उल्लेखनीय यश मिळविले.

राज्यस्तरीय कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये सुरेश कांबळे (Officer Suresh Kamble) यांच्या कार्याची विशेष दखल घेत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे सेनगाव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्याच्या शासकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुरेश कांबळे (Officer Suresh Kamble) यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण विकास योजनांबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून प्रशासनातील जबाबदारीची जाणीव आणि लोकाभिमुख दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. त्यांच्या या यशामुळे पंचायत राज व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत  असून भविष्यातही अशाच प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.