Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नर्सेस संघटनेचे  बेमुदत उपोषण; आश्वासनानंतर  सुटले

जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. कैलास शेळके आणि प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी १६ एप्रिल  बुधवार  रोजी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर संघटनेच्या  वतीने  उपोषण मागे घेण्यात आले आहे.


नर्सेस संघटनेचे  बेमुदत उपोषण आश्वासनानंतर  सुटले

Nurses Protest |

हिंगोली (Nurses Protest) : येथील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनाच्या वतीने  प्रलंबीत मागण्यासंदर्भात उपोषण सुरु केले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. कैलास शेळके आणि प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी १६ एप्रिल बुधवार रोजी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर संघटनेच्या  वतीने  उपोषण मागे घेण्यात आले आहे.

आरोग्य कर्मचारी यांचे अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मागण्या सोडविण्या-संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देवून उपोषण सुरु केले होते. त्यांच्या  विविध मागण्यामध्ये आरोग्य विभागामध्ये एम.के.डब्ल्यु.या संवर्गाचे कामकाज करण्यासाठी नियमित कनिष्ठ सहाय्यक नाही, प्रा.आ. केंद्राकडून वेतन बिले  महिन्याच्या २० तारखेपर्यंत ऑनलाईन  न टाकल्यामुळे  वेतन दरमहा उशीराने होते. ते १ तारखेपर्यंत व्हावे आदेश देण्यात यावे,गेल्या  काही वर्षापासून आश्वासीत प्रगती योजना प्रलंबीत आहे. यापैकी काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर काही मृत्यू झाले आहेत. तरीही त्यांना कालबध्द पदोन्नती मिळाली नाही. यासह विविध मागण्यासंदर्भात स्त्री व पुरुष संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते.

दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. वैâलास शेळके व प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे यांनी संघटनेला दिलेल्या लेखी आश्वासनामुळे बुधवारचे उपोषण दोन्ही संघटनेकडून मागे घेण्यात आले आहे. परंतु दिलेल्या तारखेला मागण्या पुर्ण नाही झाल्यातर दोन्ही संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात  येईल असा इशारा  संघटनेकडून देण्यात आला आहे.दरम्यान सदरील उपोषण बबन कुटे आणि ज्योती बांगर यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी संगीता गोबाडे,  किर्ती  सिताबराव, रत्नमाला मुरमाडकर, मुक्ता मुंढे, सुजाता मठपती, अनुसया सोळंके, सोनल प्रधान, गोपाल हाके, नंदकिशोर कोकाटे, साहेबराव नरोटे, आशिष पंडीत, मनोज बांगर, राजु पुंडगे, नरेश पत्की, हरिषचंद्र गोलाईतकर, अनिल पुंडगे, द्वारकादास गायकवाड यांच्यासह सेवानिवृत्त  कर्मचारी पी.डी. शिंदे, हजारे, कुलकर्णी, जोगदंड आदी सहभागी झाले होते.

Related to this topic: