Patanjali Yoga: हिंगोलीमध्ये डॉ. व्यंकटेश नंदनकर यांनी नियमित योगाच्या महत्त्वावर भर दिला. पतंजली योग वर्गाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी योगाच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन केले.
पतंजलीच्या अथर्व लॉन योग वर्गाचा सातव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
हिंगोली (Patanjali Yoga) : निरोगी जीवन सर्वांना पाहिजे असते परंतु त्यासाठी प्रयत्न फार कमी लोक करतात आणि घरच्या मोठ्या व्यक्तींकडे पाहून पुढची पिढी शिकत असते त्यामुळे वडीलधाऱ्या सर्व मंडळींनी लहान मुलांना सोबत घेऊन योग करावा व निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन मुख व दंत रोग तज्ञ डॉ. व्यंकटेश नंदनकर यांनी केले.
सव्वीस एप्रिल रोजी श्रीनगर भागातील पतंजलीच्या अथर्व लॉन योग वर्गाचा सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पतंजली भारत स्वाभिमानचे राज्यसह प्रभारी कुंडलिकराव निर्मले, जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंके, पतंजली योग पीठाचे (Patanjali Yoga) आजीवन सदस्य सुधाकर माळकर यासह पतंजलीचे पदाधिकारी व साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्गात नियमित योग मार्गदर्शन करणाऱ्या मुख्य योग शिक्षकांपैकी जिल्हा कोषाध्यक्ष उमेश तोष्णीवाल, सुषमा होकरणे, रमेश काळे यांचा देखील या वेळेस सत्कार करण्यात आला. मानवी जीवनामधील दातांचे कार्य व त्यांना निरोगी ठेवण्यासाठी डॉ. नंदनकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
राज्यसह प्रभारी कुंडलिकराव निर्मले यांनी देखील प्रसंग उचित मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामन टाकळगव्हाणकर, बालाजी वजीरे,आनंद पठाडे, नारायण भाकरे, विशाल शेटे, शेषराव जाधव, गजानन देशमुख, सुनील गुंडेवार, गजानन सावके,राजेश अग्रवाल, लता अग्रवाल, रेखा अग्रवाल,मंजू बगडिया, मनीषा तोष्णीवाल, राखी चौरसिया, तेजस्विनी टाकळगव्हाणकर, स्वाती वरखेडकर, मंगल काळे, अर्चना खंदारे, सुनिता जयस्वाल, छाया कोल्हे, रिता अग्रवाल, कौशल्य कराळे, पार्वती भिसे, प्रणिता भाकरे, पुष्पा जाधव, सुकेशनी ढवळे,अश्विनी शेटे आदींनी परिश्रम घेतले.