Babasaheb Manohare: हिंगोली नगरपालिकेच्या नयनीतीचे सह आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सहाय्यक पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केला
हिंगोली (Babasaheb Manohare) : नगर विकास विभाग हिंगोली येथील सह आयुक्त पदाचा पदभार बाबासाहेब मनोहरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी नगर विकास विभागाच्या कार्यालयात हा सत्कार समारंभ पार पडला. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी मनोहरे (Babasaheb Manohare) यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब मनोहरे यांच्या नियुक्तीमुळे हिंगोली जिल्ह्यातील नगर विकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मनोहरे (Babasaheb Manohare) यांनी जिल्ह्यातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विकास कामांना प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला.