Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

‘नीट’ पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी – विश्वनाथ सानप

देशातील लाखो तरुणांचे भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.


‘नीट’ पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी – विश्वनाथ सानप

NEET UG 2026 |

रिसोड (NEET UG 2026) : देशातील लाखो तरुणांचे भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे परीक्षा प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रिसोड विधानसभा प्रमुख तथा माजी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली आहे.

परीक्षा प्रणालीवर मोठा आघात
यावेळी बोलताना विश्वनाथ सानप म्हणाले की, “प्रवेश परीक्षांच्या सचोटी आणि पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. जर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका काही ठराविक लोकांपर्यंत पोहोचत असतील, तर हा केवळ तांत्रिक बिघाड नसून संपूर्ण परीक्षा प्रणालीवर झालेला गंभीर आघात आहे. वर्षभर दिवस-रात्र मेहनत करून तयारी करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर हा मोठा अन्याय आहे.”

पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून पात्र विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले जात असल्याचे सानप यांनी नमूद केले.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मागणी केली की,
• संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्यात यावी.
• संसदीय समिती (Parliamentary Committee) स्थापन करून चौकशीची व्याप्ती वाढवावी.
• दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

“लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा करणाऱ्यांना पाठीशी घालू नका. त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा इशाराही विश्वनाथ सानप यांनी दिला आहे.

Related to this topic: