NEET Paper Leak Case: 'नीट' निष्प्राणता हलविण्यासाठी जन आक्रोश आंदोलन नेतृत्वात, व्ही.वी. सानप आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त प्रयासाने केंद्रीय शिक्षणमंत्री धरमेंद्र प्रधान राजीनामा
'नीट' पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
रिसोड (NEET Paper Leak Case) : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जन आक्रोश आंदोलनाला आता राजकीय आणि शैक्षणिक स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. 'संविधाननिष्ठ विश्वा इंटरनॅशनल स्कूल'चे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते विश्वनाथ सानप यांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिला असून, भारतीय शिक्षण व्यवस्थेतील अराजकता नष्ट करून संविधानाने दिलेले शैक्षणिक अधिकार सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.
'नीट' (NEET) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची (NEET Paper Leak Case) नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. सरकारविरोधात आवाज दडपला जात असताना हे आंदोलन लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सानप यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असताना मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जन आक्रोश रॅलीला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विश्वनाथ सानप यांनी आपल्या समर्थका सह जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.