Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

NEET पेपर फुटी

पेपर फुटीच्या लाभार्थ्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ; नाव कोणाचेच समोर येईना!

NEET Paper leak: नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेड येथेतळ ठोकून असलेल्या पथकाने वसमत येथील दोन पालकांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. पेपर फुटीच्या लाभधारकांच्या यादीत शहरातील मोठ्या नावांची चर्चा


पेपर फुटीच्या लाभार्थ्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ नाव कोणाचेच समोर येईना

NEET Paper leak |

वसमत (NEET Paper leak) : नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेड येथेतळ ठोकून असलेल्या पथकाने वसमत येथील दोन पालकांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. पेपर फुटीच्या लाभधारकांच्या यादीत शहरातील मोठ्या नावांची चर्चा असल्याने  मोठी खळबळ उडाली आहे. 

 नांदेड येथील आर सी सी कोचिंग क्लासेसचे  संचालक मोटेगावकर नीट पेपर फुट प्रकरणात (NEET Paper leak) अडकले. त्यामुळे त्यांच्या क्लास मधील विद्यार्थी व पालकांकडे संशयाने पाहिले जात आहे वसमत तालुक्यासहीत जिल्हाभरातील  विद्यार्थी मोठ्या संख्येने त्यांच्या क्लासेस मध्ये होते. यात काही पालकांचा पेपर फूट प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे या शोध मोहिमे दरम्यान वसमत येथील काही पालकांपर्यंत शोध मोहीम पोहोचली असल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन दिवसापासून वसमत मध्ये पथक येऊन गेले, काही जणांना पुण्याला, काही जणांना नांदेडला बोलावून घेऊन चौकशी झाली, अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. नेमकी कोणाची चौकशी झाली हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

नांदेड येथील तपास पथकाचे अधिकारी वसमतला येऊन गेल्याची चर्चा शहरभर असली तरी नेमकी चौकशी झाली कोणाची याबाबत मात्र कोणीही काही सांगत नाही. या प्रकरणातील एकसह आरोपी डॉक्टर असल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे शंकेच्या नजरेने पाहिले जात आहे. या बाबत डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगितले.

Related to this topic: