राष्ट्रवादी किसान सभा पदाधिकारी व शेतकरी संवाद मिळावा शनिवारी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.
हिंगोलीत राष्ट्रवादी किसान सभेची शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न
हिंगोली (NCP Kisan Sabha) : राष्ट्रवादी किसान सभा पदाधिकारी व शेतकरी संवाद मिळावा शनिवारी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट वसंत मानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ पतंगे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी किसान सभा हिंगोली जिल्हाध्यक्ष वसंत मस्के यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक पार पडली यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट वसंत मानकर यांनी किसान सभा ही संघटना राज्यात शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मानकर 13 मार्चपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहे ते हिंगोली येथे किसान सभेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीने झाली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या मानकर यांनी जाणून घेतल्या. या बैठकीत मार्गदर्शन करताना मनकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करून त्यावर शासनाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यासाठी किसान सभा सक्रिय भूमिका बजावेल. शेतकरी व सरकार त्यांच्यात समन्वय साधत त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा प्रदेश सरचिटणीस गणेश डोंगरे किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष रामभाऊ हांडोळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रवींद्र गडदे, अशोक शिरामे, रवी डोरले, विकास शिंदे, अजय भूतनर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.