Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

Nashik TCS Case

Nashik TCS Case: धर्मांतरासाठी वर्षभर आधीच 'हानिया' नावाचा इंटरनेटवर शोध; एसआयटीचा न्यायालयात धक्कादायक दावा

नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत.


nashik tcs case धर्मांतरासाठी वर्षभर आधीच हानिया नावाचा इंटरनेटवर शोध एसआयटीचा न्यायालयात धक्कादायक दावा

Nashik TCS Case |

पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतल्याचा आरोप; ९ हजार रुपयांची 'जकात', सहसंशयितांची संख्या वाढली; जामीन अर्जावर ३० जूनला निर्णय

नाशिक (Nashik TCS Case) : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, संशयितांनी पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव 'हानिया' ठेवण्याच्या उद्देशाने तब्बल वर्षभर आधी, म्हणजे ५ एप्रिल २०२५ रोजी इंटरनेटवर संबंधित नावाचा शोध घेतला होता.

एसआयटीच्या तपासात असेही समोर आले आहे की, संशयितांनी पीडितेची सर्व शैक्षणिक कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. त्यानंतर तिचे बेकायदेशीरपणे नामांतर करण्यात आले. बदललेल्या नावाच्या आधारे तब्बल ९ हजार रुपयांची 'जकात' भरल्याचेही तपासातून निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला असून, यासंदर्भातील पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

या प्रकरणात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून मुख्य संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पुढील तपासात छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांनाही सहसंशयित म्हणून तपासाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. तपासानुसार, मतीन पटेल यांनी संशयित निदा खानला लपण्यासाठी हानिफ शेख यांचे घर उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.

याचबरोबर मालेगाव येथील 'इस्लाम पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आशिफ शेख यांनी मुख्य संशयित दानिश शेख याला कायदेशीर मदत तसेच वकील उपलब्ध करून देत जाहीर पाठिंबा दिल्याची बाबही तपासात नमूद करण्यात आली आहे.

दरम्यान, २२ जून रोजी नाशिकरोड न्यायालयात झालेल्या सुनावणीत संशयित निदा खानच्या वकिलांनी तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी अर्ज दाखल केला. निदा खान गर्भवती असून तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात आला. तसेच कारागृहात तिला जड स्वरूपाची कामे करावी लागत असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला असल्याने तातडीच्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कारागृह प्रशासनाला तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले.

सध्या मुख्य संशयित निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर १९ जून रोजी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून सुमारे तीन तास युक्तिवाद झाला होता. या प्रकरणात एसआयटीने तब्बल १५०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. जामीन अर्जावरील अंतिम आदेश २५ जून रोजी अपेक्षित होता, मात्र न्यायालयाच्या व्यस्त कामकाजामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता ३० जून रोजी न्यायालय संशयितांचा जामीन मंजूर करणार की अर्ज फेटाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: