Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

Nashik Earthquake

नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; पेठ, सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.


नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले पेठ सुरगाणा आणि दिंडोरीत सौम्य हादरे

Nashik Earthquake |

दुपारी १२:४० वाजता पेठ-सुरगाण्यात, तर पाच मिनिटांनी दिंडोरीत जाणवले धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या तीन तालुक्यांमध्ये दुपारच्या सुमारास जमिनीला हादरे जाणवले. अचानक झालेल्या या हालचालींमुळे काही नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली.

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरासह पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव येथे दुपारी १२:४० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी, म्हणजेच दुपारी १२:४५ वाजता दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि बागडीचा पाडा परिसरातही जमिनीचे हादरे जाणवले.

नाशिकच्या या भागात गेल्या काही काळापासून अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार होणाऱ्या या भूकंपीय हालचालींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात चार ते पाच वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related to this topic: