Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक

Nashik ACB

नाशिक मध्ये ACBची मोठी कारवाई; लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना दोन पोलिस पकडले

नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे.


नाशिक मध्ये acbची मोठी कारवाई लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना दोन पोलिस पकडले

Nashik ACB |

उपनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल अटकेत; ३० हजारांच्या लाचेपैकी १० हजार रुपये स्वीकारताना सापळ्यात अडकले

नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

माहितीनुसार, एका घरगुती वादाशी संबंधित प्रकरणात एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. या घटनेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते, असे सांगून संबंधित तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली.

तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर ACBने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. कारवाईदरम्यान ACBच्या पथकाने आवश्यक पुरावेही जप्त केले.

या प्रकरणी दोन्ही पोलिसांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांची चौकशी सुरू असून, या कारवाईमुळे नाशिक पोलिस दलात चर्चांना उधाण आले आहे.

Related to this topic: