जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंगोली (Narhari Zirwal) : हिंगोली येथील जिल्हा कोषागार कार्यालयासमोरील तालुका क्रीडा संकुलामध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय मंत्री आणि पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.