Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

नंगारा विरासत म्युझियम

नंगारा विरासत म्युझियमची तिकीट १०० रुपये करा; उद्या ताला ठोको आंदोलन

Nangara Virasat Museum: नंगारा विरासत म्युझियमला दर्शकांना २०० रुपयेची टिकिटदर असल्यास गरिब भक्तांना पाहणे थोरले बाधा होईल, असे वाटून धार्मिक नेत्यांची तिकिट दर १०० रुपये करावी


नंगारा विरासत म्युझियमची तिकीट १०० रुपये करा उद्या ताला ठोको आंदोलन

Nangara Virasat Museum |

मानोरा (Nangara Virasat Museum) : बहुजन बांधवांची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशभरातून येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या सामान्य भाविक भक्तांची भावना लक्षात घेऊन नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी १०० रुपये तिकीट दर निश्चित करावे, या मागणीसाठी धर्मगुरु जितेंद्र महाराज आणि धर्मगुरु कबिरदास महाराज यांनी जिल्हा सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार उद्या मंगळवारला दि. ४ ऑगस्ट रोजी शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ताला ठोको आंदोलन करणार आहे.

 जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तीर्थक्षेत्र काशी पोहरादेवी संत नगरीत येणारा भाविक भक्त हा गरीब शेतमजूर असल्याने नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी २०० रुपये तिकीट हे न परवडणारे आहे. त्यामुळे २०० रुपये तिकिटावरून १०० रुपये करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सहनियंत्रण समितीचे अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहाराने पाठपुरावा करूनही भाविकांची थट्टा केली जात आहे.

याआधी तिकीट दर १०० रुपये व्हावा यासाठी २५ जुलै २०२६ रोजी (Nangara Virasat Museum) नंगारा विरासत म्युझियम संग्रहालयाला शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ताला ठोकण्याच्या इशाऱ्यांचे आंदोलन धर्मगुरू जितेंद्र महाराज आणि धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी दिले होते. परंतु  गुरुपौर्णिमा निमित्त ३ दिवस तिकीट दर १०० रुपये करण्याचा आदेश सबंधित अल्फा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन ३० जुलै २०२६ रोजी यासंदर्भात निर्णय घेण्याचा ठरविले होते. परंतु प्रत्यक्षात कुठलाही निर्णय न झाल्याने पुन्हा ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना धर्मगुरूंनी दिला आहे.

संतनगरी काशी पोहरादेवीत येणारा भाविक भक्त गरीब वर्ग आहे. त्यामुळे नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी २०० रुपये त्यांना परवडत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन तसेच बैठकीत तिकीट दर १०० रुपये करण्यासाठी अवगत केले आहे. आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने ताला ठोको आंदोलन करावे लागत आहे.
-धर्मगुरु जितेंद्र महाराज, गोरबंजारा धर्मपीठ वसंतनगर पोहरादेवी

Related to this topic: