Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

नणंद बंधारा आग

अज्ञाताने बंधारा पेटविल्याने नणंदमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nanand dam fire: नणंदमध्ये बंधारा पेटविल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आग्रहानुसार शिवसेनेने तात्काळ मदतीची मागणी केली आहे.


अज्ञाताने बंधारा पेटविल्याने नणंदमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान 

Nanand dam fire |

निलंगा (Nanand dam fire) : अज्ञाताने बंधाऱ्याला पेटवून दिल्याने की आज बंधाऱ्यावरून थेट अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पसरत जाऊन शेतकऱ्याचे आगीत मोठे नुकसान झाले. निलंगा तालुक्यातील नणंद येथे सोमवारी ही दुर्घटना घडली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

निलंगा तालुक्यातील नणंद येथे सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतीच्या बांधास आग लावली. ही (Nanand dam fire) आग जवळपास 50 एकरावर पसरत गेली. या आगीत शेतकरी बालाजी नामदेव गंभीरे यांच्या शेतातील गवत, रानावरील स्प्रिंकलर, स्प्रिंकलरचे पाईप, मोटार, वायर केबल, गुळी, कडबा इत्यादी शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. बालाजी नामदेव गंभीरे यांचे स्टार्टर, वायर, पाईप, बेंड याला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

निळू नागनाथ लादे यांचा स्प्रिंकलर संच जळून खाक झाला. तसेच करीमखा पठाण यांची जनावरांना ठेवलेले गुळी, कडबा जळून खाक झाला. प्रशासनाने तात्काळ येऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.

Related to this topic: