Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

नांदुराचे तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर तहसील कार्यालयात प्राणघातक हल्ला; आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

नांदुरा तहसील कार्यालयात आज दुपारी धक्कादायक घटना घडली असून, कर्तव्यदक्ष तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला.


नांदुराचे तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर तहसील कार्यालयात प्राणघातक हल्ला आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल

Nandura Attack Case |

नांदुरा (Nandura Attack Case) : नांदुरा तहसील कार्यालयात आज दुपारी धक्कादायक घटना घडली असून, कर्तव्यदक्ष तहसीलदार अजितराव जंगम यांच्यावर त्यांच्या दालनात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून नांदुरा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार श्रीशैल सुभाष व्हटटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना आरोपी समाधान भगवान मोरे (रा. बुलडाणा) व त्याच्यासोबत एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अनोळखी इसम तहसील कार्यालयात आले.

तहसीलदार अजितराव जंगम यांनी वाळू वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक MH-28AB-7638 पकडून त्यावर कायदेशीर कारवाई केल्याचा राग मनात धरून आरोपींनी प्रथम अव्वल कारकून स्वप्नील चव्हाण यांच्याशी वाद घालत धमकावले. त्यानंतर आरोपी तहसीलदारांच्या दालनात घुसले व लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर मागून गळा पकडून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांना खाली पाडले आणि त्यांचा शर्ट फाडला.

हल्लेखोरांनी “तू वाळूच्या गाड्या पकडतो, तुला यापुढे जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही धमकावत धक्काबुक्की व मारहाण केली. त्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या विनानंबर क्रेटा कारमधून घटनास्थळावरून पळून गेले.

या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. २८०/२०२६ अन्वये कलम १३२, १२१(१), १२१(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत असून, महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणी अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related to this topic: