State Employees Strike: नांदेडमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संप यशस्वी झाला असून विभागीय एकजुटीच्या बळावर सर्व प्रश्नांचे सकारात्मक समाधान साधण्यात आले आहे.
नांदेडमध्ये संघटनात्मक एकजुटीचा विजय: लक्ष्मण नरमवार
नांदेड (State Employees Strike) : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने २१ एप्रिल २०२६ पासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप नांदेड जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसादानंतर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील सर्व विभागीय कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी दाखवलेली एकजूट या संघर्षाचे मुख्य बळ ठरली. या यशानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत विशेष कौतुक केले आहे.
या (State Employees Strike) आंदोलनात विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनंजय साले, सतीश पवार, विश्वंभर ढगे; शासकीय तंत्रनिकेतनचे बालाजी सरोदे, शेख शाकीर, साईनाथ अस्पत; कोषागार विभागाचे बालाजी देशमाने, सचिन उल्लेवाड, स्वप्निल कांबळे; आयुर्वेद विभागाचे विक्रम बैस, पंकज वाटोरे; पोलीस अधीक्षक कार्यालयातील श्रीकांत भंडारे, एस. बी. भोसले; औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लोखंडे, भोसीकर, शिलेदार; सामाजिक वनीकरण विभागाचे आशिष कुलकर्णी; जलसंपदा विभागाचे लक्ष्मण जाधव, शिवशंकर मोरे, दत्ता मस्के यांच्यासह इतर सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांच्या योगदानाचा जिल्हाध्यक्षांनी गौरव केला.
विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनंजय साले यांनी (State Employees Strike) आंदोलनाच्या संपूर्ण काळात ठेवलेला समन्वय, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे जिल्हास्तरावर हे आंदोलन अधिक प्रभावी झाले. त्यांच्या या नेतृत्वाचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. आरोग्य, सहकार, भूमी अभिलेख, वन विभाग, महसूल, वस्तू व सेवा कर आणि आरटीओ अशा सर्वच विभागांच्या सहकार्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आता सकारात्मक टप्प्यावर पोहोचले आहेत. हीच एकजूट आणि शिस्त भविष्यातही कायम राहो, अशी अपेक्षा लक्ष्मण नरमवार यांनी व्यक्त केली आहे.