Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड काँग्रेस अभियान

काँग्रेसच्या 'संघटन सृजन अभियाना'चा नांदेडमधून प्रारंभ

Nanded Congress Campaign: नांदेडमध्ये काँग्रेसने त्यांच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी ९ एप्रिलपासून 'संघटन सृजन अभियान' सुरू केले आहे.


काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाचा नांदेडमधून प्रारंभ

Nanded Congress Campaign |

१० दिवस तालुकास्तरावर होणार बांधणी

​नांदेड (Nanded Congress Campaign) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, पक्षाचे संघटन गावपातळीपर्यंत बळकट करण्यासाठी 'संघटन सृजन अभियान' ९ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात दिमाखात सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्ष निरीक्षक रवींद्र दळवी यांनी पत्रकारांशी संवाद साधून अभियानाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला.​पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र दळवी म्हणाले की, "देशपातळीवर काँग्रेसचे नवनिर्माण करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील गाव आणि मोहल्ला स्तरावरील संघटन अधिक मजबूत करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. पक्षातील निष्ठावान आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांची निवड करून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल."​हे (Nanded Congress Campaign) अभियान जिल्ह्यात पूर्ण ताकदीनिशी राबवले जाणार आहे. यामध्ये निरीक्षकांची समिती प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन ९ ते २० एप्रिल पर्यंत बैठका घेणार आहेत. केवळ पक्षांतर्गत बैठकाच नव्हे, तर समाजातील विविध घटक जसे की दलित, उपेक्षित, वंचित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समूहांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशीही ही समिती थेट संवाद साधणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

​या (Nanded Congress Campaign) समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) निरीक्षक हरकला वेणुगोपाल राव, पक्ष निरीक्षक रवींद्र दळवी, श्रीशैल्य उटगे, अमर खानापुरे, महेश गठाणे, अशोक पाटील निलंगेकर, डॉ. सतीश पाचपुते आदींचा समावेश आहे.​यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माजी आमदार माधवराव जवळगावकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रेखा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड, रामदास पाटील सुमठाणकर, सुरेश गायकवाड, युवक काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अतुल पेदेवाड, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष सुरज शिंदे, प्रदेश महासचिव किरण पडलवार, युवक काँग्रेसचे सत्यजीत बिरादार, दक्षिण जिल्हा महिलाध्यक्षा आरती डोईपळे यांच्यासह सर्व प्रदेश व जिल्हा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

​या (Nanded Congress Campaign) अभियानामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला नवी गती मिळणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मशागत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Related to this topic: