Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

स्वाधार योजना

स्वाधार योजनेची त्रुटी पूर्तता करण्यासाठी ७ जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

Swadhar Yojana: नांदेडमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या लाभासाठी त्रुटीपूरक करण्यासाठी शिवानंद मिनगिरे यांनी ७ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ सांगितला


स्वाधार योजनेची त्रुटी पूर्तता करण्यासाठी ७ जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

Swadhar Yojana |

 

विद्यार्थ्यांनी तातडीने त्रुटीची पूर्तता करावी, शिवानंद मिनगिरे यांचे आवाहन

नांदेड (Swadhar Yojana) : अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी ५० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाहीये अशा विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना राबवली जात आहे. सदरील योजना ही  जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावर राबविण्यात येत असून जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आत मध्ये व नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी  सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात  त्रुटी अभावी प्रलंबित असलेले अर्ज असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्याकरिता https//hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पहावी जर अर्ज Send Back मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या परिपूर्ण कागदपत्रासह ७ जुलै २०२६ या कालावधीत संधी देण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत (Swadhar Yojana) प्राप्त अर्जांची छाननी सुरू असून अनेक अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता किंवा तांत्रिक त्रुटी आढळून आले आहेत. माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. तरी  स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बुल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदत वाढीचा लाभ घेऊन पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर कराव्यात. सदरील मुदतवाढ हि शेवटची असेल व यानंतर आपला अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. तेंव्हा आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर तसेच मेल आय डी वर सदरील मेसेज देण्यात आले आहेत. तेंव्हा तत्काळ स्वाधार ला अर्ज करायचा आहे.

जर आपला अर्ज Approved असेल तर आपल्या बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी योग्यरीत्या भरायचे आहे आपले बँक खाते क्रमांक हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत कार्यालया अंतर्गत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडियाचे पेज इंस्टाग्राम व फेसबुक पेज samajkalyannanded. याला फॉलो करून आपल्या येणाऱ्या अडचणी बाबत वेळोवेळी त्याच्यावर देण्यात आलेली माहिती पहावी व आपल्या शंकेचे निरसन करावे, तसेच बाहेर इतर कुठल्याही अनाधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीशी संपर्क न साधता थेट प्रस्तुत कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांना येऊन आपली समस्या बद्दल विचारणा करावी  असे आवाहन शिवानंद मिनगिरे,  सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नांदेड. यांनी सर्व विद्यार्थ्यांना केलेले आहे.