Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

रोटरी क्लब ऑफ नांदेड

रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Rotary Club of Nanded: रोटरी क्लब ऑफ नांदेड आणि रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि १ जुलै  रोजी कृषी दिन, डॉक्टर दिन, सीए दिन आणि रोटरी नूतन वर्षारंभाचे औचित्य साधून वृक्षारोपण


रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे वृक्षारोपण व भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

Rotary Club of Nanded |

३० रक्तदात्यांचे एक लाख रूपयाचे मोफत विमा

​नांदेड (Rotary Club of Nanded) : रोटरी क्लब ऑफ नांदेड आणि रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि १ जुलै  रोजी कृषी दिन, डॉक्टर दिन, सीए दिन आणि रोटरी नूतन वर्षारंभाचे औचित्य साधून भव्य वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शहरातील सायन्स कॉलेजच्या क्रीडांगणावर विविध प्रकारच्या एकूण ६० वृक्षांचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, या लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए. डॉ. प्रवीण पाटील यांनी स्वीकारली आहे.

​तसेच सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या (Rotary Club of Nanded) भव्य रक्तदान शिबिरामध्ये एकूण ३० सुजाण नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांच्या या अमूल्य योगदानाचा आदर करत रोटरी क्लब ऑफ नांदेडतर्फे सर्व ३० रक्तदात्यांना १ लाख रुपयांचा विमा मोफत आणि सन्मानपत्र रोटरी क्लब ऑफ नांदेडच्या वतीने देण्यात आले.

याच दिनाचे औचित्य साधून नांदेडमधील नामवंत डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट (सीए) यांचा रोटरीतर्फे विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही यावेळी घोषित करण्यात आले.​ या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ नांदेडचे अध्यक्ष रो. सुरेश अंबुलगेकर, सचिव रो. प्रशांत गुर्जर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवून परिश्रम घेतले.