Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

रेल्वे भीषण आग

हुजूर साहेब रेल्वेस्टेशनवर रेल्वेच्या रिकाम्या डब्याला भीषण आग; संपूर्ण सीट जळून खाक

Nanded Railway fire: नांदेड येथील हुजूर साहेब रेल्वेस्टेशनच्या मेंटेनन्स सेक्शनमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना २१ मे रोजी सकाळी घडली. सुदैवाने हा


हुजूर साहेब रेल्वेस्टेशनवर रेल्वेच्या रिकाम्या डब्याला भीषण आग संपूर्ण सीट जळून खाक

Nanded Railway fire |

 

नांदेड (Nanded Railway fire) : येथील हुजूर साहेब रेल्वेस्टेशनच्या मेंटेनन्स सेक्शनमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना २१ मे रोजी सकाळी घडली. सुदैवाने हा डबा रिकामा असल्याने आणि मुख्य प्लॅटफॉर्म लाईनपासून दूर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीत डब्यातील सर्व सीट जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड विभागातील हुजूर साहेब रेल्वेस्टेशनवर सकाळी ६ वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म लाईनपासून दूर उभ्या असलेल्या एका रिकाम्या डब्यातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाला निघत असल्याचे निदर्शनास आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. तेथे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या आणि अग्निशामक साधनांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रेल्वे प्रशासनाच्या या तातडीच्या कार्यवाहीमुळे तब्बल ४५ मिनिटांनी, म्हणजेच सकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.मात्र एका बोगीतील सीट,वायरींग आणि बोगी जळून मोठे नुकसान झाले आहे.

तापमानातील वाढीमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ?

या (Nanded Railway fire) दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या वाढत्या उष्णतेमुळेच जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

"रेल्वे डब्याला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीचे मुख्य कारण शोधण्याचे काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे."
- रेल्वे प्रशासन, नांदेड विभाग