'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा नांदेडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.
नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचे 'जनआक्रोश आंदोलन'
नांदेड (Nanded Protest) : 'नारीशक्ती वंदन अधिनियम' कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा नांदेडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महानगर युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी शहरातील आयटीआय चौक परिसरात निदर्शने करण्यात आली. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपा युवा मोर्चाने हे 'जनआक्रोश आंदोलन' केले.
'नारीशक्ती वंदन अधिनियम' विधेयक भाजपाने लोकसभेत मांडले होते. या कायद्यामुळे महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु, "काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून आपली महिलाविरोधी मानसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महानगरच्या वतीने आयटीआय चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. हे विधेयक संसदेत पारित व्हावे आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या समर्थनातील या विधेयकाला पाठिंबा द्यावा, अन्यथा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर यांनी दिला आहे.

या आंदोलनात भाजपाचे महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील क्षीरसागर, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. ज्योतीताई कल्याणकर, नगरसेविका सुप्रियाताई संजय पाटील रातोळीकर, कविता गड्डम, मंजूशा राणवळकर, ज्योत्स्ना लांडगे, सुषमा थोरात, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले,उमेश चव्हाण,विजय येवणकर, विजय गंभीरे,शीतल खांडील,सुमित मुथा, करणसिंग खालसा, मनोज भंडारी, आशिष नेरलकर, बालाजी शेलगावकर, ओम बंडेवार, करण चव्हाण, शिवा लोट, प्रियेश ठाकूर, शिवकुमार बैनवाड, पवन इंगोले, राहुल देशमुख, प्रेम विर, अक्षय पवार, विशाल गिरी, अर्जुन कोकाटे, सचिन नरंगले, विशाल संपतावर, शुभम खोडके, बालाजी बोकारे, निखिल पुरी,अध्ययन तेहरा यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.