Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

NCC शिबिर कार्यक्रम

सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात गाजविले मैदान

NCC Camp Program: नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे आयोजित NCC शिबिरात, सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या दहा विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.


सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमात गाजविले मैदान

NCC Camp Program |

हिंगोली (NCC Camp Program) : सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थिनींनी नुकत्याच नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर येथे पार पडलेल्या एनसीसीच्या शिबिरात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शिबिरात विद्यालयाच्या दहा विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. वाघमारे सांची शीलसागर, जगताप माहेश्वरी कैलास, वाघमारे माहेश्वरी माधव, घुगे ज्ञानेश्वरी दत्तराव, पिहू खडसे गौतम, गोगटे अपर्णा सुधीर, वाघमारे प्रांजल अश्विन, बोधनकर शिल्पा राजू, घ्यार प्रयुक्ता विजय आणि भवन पायल रमेश या विद्यार्थिनींनी शिबिरातील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

या (NCC Camp Program) शिबिरात विद्यार्थिनींना ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण आणि मानचित्र प्रशिक्षण असे विविध प्रकारचे लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींमध्ये एकता आणि अनुशासनाची भावना दृढ करण्यावर विशेष भर देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यासोबतच गोगटे अपर्णा सुधीर हिने फायरिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नावलौकिक केले. या विद्यार्थिनींना फर्स्ट अधिकारी सोनल जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या  त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे. शिबिरातील या अनुभवामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि देशसेवेची प्रेरणा अधिक बळकट झाल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.