Nahad Accidental death: कावड यात्रेचा महाप्रसाद घेऊन परत येत असताना नहाद शिवारात एका मोटर सायकल चालकाने त्यांच्या मोटर सायकलला दिलेल्या धडकेत दाम्ंप्त्यांचा मृत्यू झाला.
हट्टा पोलिस ठाण्यात दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल
हिंगोली (Nahad Accidental death) : वसमत तालुक्यातील नहाद येथील दांपत्य खांडेगाव शिवारातील कावड यात्रेचा महाप्रसाद घेऊन परत येत असताना नहाद शिवारात एका मोटर सायकल चालकाने त्यांच्या मोटर सायकलला दिलेल्या धडकेत दाम्ंप्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत हट्टा पोलिस ठाण्यात मोटर सायकल चालकावर १ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील नहाद येथील दत्तराव दादाराव बोरगड (४२) व त्यांची पत्नी सुनिता दत्तराव बोरगड (३८) हे दोघे ३१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास खांडेगाव शिवारातील कावड यात्रेचा महाप्रसाद घेण्याकरीता गेले होते. तेथील महाप्रसाद घेतल्यानंतर परत येत असताना वसमत ते नहाद रस्त्यावर काचगुंडे यांच्या शेताजवळ नहादकडे जाणारी मोटर सायकल क्रमांक एम. एच.३८ ए.एन. १६१३ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीणे चालवून दत्तराव बोरगड यांच्या मोटर सायकलला धडक दिल्याने दत्तराव बोरगड व सुनिता बोरगड हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. या (Nahad Accidental death) अपघाताची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर तात्काळ अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातस्थळी (Nahad Accidental death) तिघेजण जखमी झाल्याने त्यांना वसमत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दत्तराव बोरगड व सुनिता बोरगड या दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. तर दुसर्या मोटर सायकलवरील जखमी झालेल्या व्यक्तीवर प्रथमोपचापर करून त्याला नांदेड रुग्णालयात हलविण्यात आले. दत्तराव बोरगड व सुनिता बोरगड या दोघांचे १ सप्टेंबरला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. दोघांवर बोरगड यांच्या शेतामध्ये एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत दत्तराव व सुनिता बोरगड यांच्या पश्चात तीन मुले असा परिवार आहे.
या (Nahad Accidental death) घटनेप्रकरणी १ सप्टेंबर रोजी हट्टा पोलिस ठाण्यात वैभव दत्तराव बोरगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोटर सायकल क्रमाक एम.एच.३८ ए. एन.१६१३ च्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज गवळी हे करीत आहेत.