Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

व्यसनमुक्ती जनजागृती

नागपुरात व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी प्रभावी पथनाट्य

Addiction Awareness: नागपुरातील रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राने विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात आला.


Addiction Awareness

रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नागपूर (Addiction Awareness) : नागपुरातील न्यू अमर नगर परिसरात रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र (लेडीज अँड जेन्ट्स), कल्पतरू नगर यांच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. या उपक्रमाद्वारे समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता (Addiction Awareness) निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला. या पथनाट्याची संकल्पना व मार्गदर्शन संचालिका सौ. प्रांजली ताल्हन (वांढरे) यांनी केले. तसेच मातृ सेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क येथील एम.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

न्यू अमर नगर परिसरात नागरिकांकडून कौतुक, व्यसनमुक्तीचा संदेश व्यापक करण्याचा निर्धार

पथनाट्यात स्नेहल दखने, प्रियंका वैद्य, सोनाली कांबळे, प्रियंका लोहकरे, निखिल राऊत, विश्वजित भुजाडे, अश्विन भलावी आणि हितांशी वांढरे यांनी प्रभावी भूमिका साकारून व्यसनमुक्तीचा संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचवला. पथनाट्याचे दिग्दर्शन समुपदेशक अनंत घुलक्षे यांनी केले असून, (Addiction Awareness) उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रिफ्रेश केंद्राचे कर्मचारी रोहित येतने यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी पथनाट्याचे मनापासून कौतुक करत व्यसनमुक्तीचा संदेश समाजात अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच, हा जनजागृती उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Related to this topic: