Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान महिला मृत्यु

कन्हान हद्दीतील अपघातातील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

Kanhan Woman Death: नागपुर जबलपुर महामार्गावर अपघातात गंभीर जख्मी महिलेला कामठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केल्यावर उपचारा दरम्यान महिलेचा मुत्यु


कन्हान हद्दीतील अपघातातील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु

Kanhan Woman Death |

कन्हान (Kanhan Woman Death) : डुमरी फार्म जवळ नागपुर जबलपुर महामार्गावर अचानक दुचाकी सामोर माकड आडवे आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जख्मी महिलेला कामठी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केल्यावर उपचारा दरम्यान महिलेचा मुत्यु झाल्याने नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अपघाताचे स्थळ कन्हा न पो.स्टे. अंतर्गत असल्याने अपघाती मृत्यु प्रकरणाचा तपास व संबंधित मूळ कागदपत्रे कन्हान पोस्टे कडे वर्ग करण्यात आले.  
           
फिर्यादी जॉन प्रदीप चौरे वय २२ वर्ष रा. कांद्री - कन्हान यांचे आई, वडील हे (दि.२४) जुलै २०२६ रोजी दुचाकी क्र. एमएच ४० सी के ५२७७ ने नातेवाई काकडे चौदवी कार्यक्रमात जावुन घरी परत येताना  नागपुर जबलपुर मार्गावरील डुमरी फॉर्म जवळ दुचा की समोर अचानक माकड आल्याने ब्रेक दाबल्याने  वाहन घसरून अपघात झाला. या अपघातात सुनंदा प्रदीप चौरे वय ४२ वर्ष, रा. कांद्री-कन्हान या गंभीर जख्मी झाल्या होत्या. त्यांच्यावर कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना (दि.१) ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नवीन कामठी पोलीस ठाण्यात कलम १९४ बीएनएस अन्वये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.

मात्र (Kanhan Woman Death) अपघाताचे घटनास्थळ कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येत अस ल्याने सदर मृत्यु प्रकरणाची मूळ डायरी व सर्व कागद पत्रे पुढील तपासासाठी कन्हान पोलीस स्टेशन ला नविन कामठी चे पोलीस उनिरिक्षक श्रीकांत गोडें यानी अपघाती मुत्यु प्रकरण वर्ग करण्यात आल्याने पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.