Golden Melodies of Bollywood: संगीतप्रेमी रसिकांसाठी नागपुरात हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर (Golden Melodies of Bollywood) : संगीतप्रेमी रसिकांसाठी नागपुरात हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गीतांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. ‘गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात रसिकांना हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय आणि अविस्मरणीय गीतांचा आनंद घेता येणार आहे. हा संगीत कार्यक्रम १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह, नागपूर येथे होणार आहे.
या (Golden Melodies of Bollywood) कार्यक्रमात अमित अंधारे, मनश्री जोशी, गिरीश बडे, ज्योती बनकर, आनंद गायदनी, नीलिमा उराडे, साक्षी त्यागी आणि धीरज पायपल्लीवार हे कलाकार आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. धनश्री सेवळकर करणार आहेत. गोल्डन स्ट्रिंग्स म्युझिकल ग्रुप हा कार्यक्रमाचा आयोजक असून, अमित अंधारे यांच्या आयोजनातून ही संगीत मैफल साकारत आहे.
विशेष म्हणजे, या (Golden Melodies of Bollywood) कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, संगीतप्रेमींनी आपल्या परिवारासह आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम : गोल्डन मेलोडीज ऑफ बॉलिवूड
दिनांक : १२ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ५.४५ वाजता
स्थळ : सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर
प्रवेश : विनामूल्य