Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्प

थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पावरील आक्षेप निकाली निघेपर्यंत सर्वेक्षण व मोजणीची कामे थांबविण्याची शेतकऱ्यांची मागणी

Third Outer Ring Road Project: थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांनी नागपुरच्या पारशिवनी तालुक्यात ड्रोन मॅपिंग व जिपीएस सर्वेक्षण थांबविण्याचा सांगितला आहे.


थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पावरील आक्षेप निकाली निघेपर्यंत सर्वेक्षण व मोजणीची कामे थांबविण्याची शेतकऱ्यांची मागणी

Third Outer Ring Road Project |

कन्हान (Third Outer Ring Road Project) : नागपुर थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आक्षेपांवर निर्णय होण्यापूर्वी सुरू असलेली ड्रोन मॅपिंग, जीपीएस सर्वेक्षण, मोजणी व दगड रोवण्याची कामे तात्काळ थांबविण्याची मागणी करत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव, गवणा, गुंढरी (वांढे ), पारडी, इटगाव, बखारी, नांदगाव, महाजनको, वाघोली, केरडी, निमखेडा, बोरी (राणी), पांजरा (रिठी ), खेडी आणि बोरी (सिंगोरी) या गावांतील सुमारे ६४३ शेतकऱ्यांच्या सुपीक शेतीजमिनी संपादित कर ण्याचे प्रस्तावित आहे. या जमिनी अनेक पिढ्यांपासुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असुन, त्यांचे अधिग्रहण झाल्यास शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालया मार्फत नियमानुसार आपल्या हरकती व आक्षेप दाख ल केल्या आहेत. मात्र एक महिन्याहुन अधिक कालाव धी उलटुनही त्या आक्षेपांवर कोणताही निर्णय, सुनाव णी किंवा उत्तर देण्यात आलेले नाही. असे असतानाही प्रशासनाकडुन ड्रोन सर्वेक्षण, जीपीएस मोजणी आणि दगड रोवण्याची कामे सुरू करण्यात आल्याने शेतक ऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनावर तिव्र नाराजी व्यक्त करित प्रकल्पाबाबत पुरेशी माहिती न देता दगड रोवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप केला आहे.  

शेतकरी संघर्ष सेनेच्या वतीने संबंधित अधिका ऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे की, शेतकऱ्यांच्या सर्व (Third Outer Ring Road Project) आक्षेपांवर कायदेशीर निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण किंवा मोजणीची कामे करण्यात येऊ नयेत. तसेच बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पाची संपुर्ण माहिती, आक्षेपांवरील निर्णय व पुढील कार्यवाही पार दर्शकपणे जाहीर करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार अस ल्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना सुधाकर उमाळे, राहुल वानखेडे, सारंग झाडे, ओमप्रकाश काकडे, दिपक झाडे, संतोष ठाकरे, रोशन तडस, दिपक यादव, विनायक काठोके, अशोक ठाकरे, भोजराज काकडे,  सागर खंडाळ, चक्रधर ठाकरे, दिपक भोयर, प्रफुल कावळे, भिमराव काकडे, पंकज नागपुरे, कैलास ठाकरे, विजय ठाकरे, नेमदेव वैद्य, शंकर काळे, बंडुजी ठाकरे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.