Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

शहरातील प्रत्येक नवीन बांधकामात पार्किंगला प्राधान्य द्या

शहरात सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या प्रत्येक नवीन बांधकामामध्ये पार्किंगसाठी मुबलक जागा ठेवण्याला प्राधान्य द्या, असे स्पष्ट निर्देश नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.


शहरातील प्रत्येक नवीन बांधकामात पार्किंगला प्राधान्य द्या

Nagpur Development |

नागपूर शहरातील विविध विकास कामांचा घेतला आढावा

नागपूर (Nagpur Development) : महापालिका, एमएसआयडीसी आदी यंत्रणांच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या प्रत्येक नवीन बांधकामामध्ये पार्किंगसाठी मुबलक जागा ठेवण्याला प्राधान्य द्या, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रशासनाला दिले. यामध्ये विशेषत्वाने नव्याने निर्माण होत असलेले भाजी बाजार, मटण-मच्छी मार्केट, फूड मॉल, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आदींचा समावेश आहे. गरज भासल्यास पार्किंगसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तोडगा काढावा, अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या.

शाळा-महाविद्यालयांच्या शेजारी असलेल्या टपऱ्या तातडीने हटविण्याचे निर्देश

मुख्यमंत्री सचिवालयात (हैदराबाद हाऊस) आयोजित बैठकीत शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार मोहन मते आणि कृष्णा खोपडे, महापौर नीता ठाकरे, गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, एमएसआयडीसीचे महाव्यवस्थापक ब्रजेश दीक्षित आदींची यावेळी उपस्थिती होती.

महापालिका, एमएसआयडीसी, मिहान, विभागीय क्रीडा संकुल, वैद्यकीय शिक्षण सुविधा आणि म्हाडा अंतर्गत नागपूर शहरातील विविध विकास प्रकल्प नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या दक्षताही यावेळी गडकरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

महापालिकेअंतर्गत लाख लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट, फूड मॉल हॉकर झोन उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही कामे पूर्ण करताना पार्किंगची योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यासाठी 'एकात्मिक विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली'चा आधार घ्यावा आवश्यक बदल करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

​​​​​​​

नऊ झोनमध्ये ८९ किलोमीटरचे १३५ रस्ते बनविण्याचा प्रस्ताव

सक्करदरा बाजार, सोख्ता भवन, बुधवार बाजार आणि ५व्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची शहरातील कामे पूर्ण करताना आधी समस्या पुढे ठेवून सोडविण्याच्या दिशेने कार्य करण्याबाबतही यावेळी निर्देश देण्यात आले. पाचव्या टप्या अंतर्गत शहरातील झोनमध्ये ८९ किलोमीटरचे १३५ रस्ते प्रस्तावित आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. शहरातील पाणी पुरवठ्याविषयी झालेल्या चर्चेत पाणी गळती थांबविण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत राज्यातील अन्य शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या आदर्श पद्धतींचा अभ्यास करून त्या आधारे व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आणि डीग दवाखाना यांच्या पुनर्विकास करताना घ्यावयाच्या काळजीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

विभागीय क्रीडा संकुलासह विविध प्रकल्पांवर मंथन

दाभा येथील इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरच्या स्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच विभागीय क्रीडा संकुलाबाबत सौर ऊर्जेचा वापर करणे, वेळोवेळी कामाची गुणवत्ता तपासणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (मेडिकल) येथील पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, प्रशासकीय इमारत, क्रीडांगण उभारणे आदी सुरू असलेल्या विकासकामांची माहिती यावेळी देण्यात आली काही मागणे आहे प्रस्तुत करण्यात आल्या. यशवंत स्टेडियम पुनर्विकास प्रकल्प, नाग पोहरा नदी प्रकल्पांची प्रगती, वाढत्या लोकसंख्येसाठी भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाळी नाले सांड पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली. काचीपुरा कृषी महाविद्यालय परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबतही चर्चा झाली.

अतिक्रमणे काढा, अवैध टपऱ्या हटवा !

नागपुरातील शाळा-महाविद्यालय परिसरातील अवैध पान-टपऱ्या किंवा इतर दुकाने तातडीने हटवावी. संपूर्ण शहरात फूटपाथ ओलांडून अगदी रस्त्यावर दुकाने थाटण्यात आली आहेत. ही दुकाने तातडीने हटविण्यात यावी. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देशना. गडकरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी शहरातील अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Related to this topic: