World Clubfoot Day: जागतिक क्लबफूट दिवसासाठी नागपूरमध्ये पालकांशी सांवाद करून मुलांची जलद ओळख आणि उपचाराचे महत्त्व प्रचारित केले. डॉ. सीतान्शू बारीक यांनी पालकांच्या भागीदारी
नागपूर (World Clubfoot Day) : जागतिक क्लबफूट दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यात क्लबफूटग्रस्त मुलांच्या पालकांशी व कुटुंबीयांशी संवाद साधून जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जन्मतः क्लबफूट असलेल्या मुलांची लवकर ओळख, वेळेवर निदान आणि उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मधील डॉक्टर सीतांशू बारीक यांनी सांगितले की, “क्लबफूट ही जन्मजात विकृती असली तरी वेळेवर व नियमित उपचारांद्वारे मुलांना पूर्णपणे सामान्य जीवन जगणे शक्य होते. पालकांनी उपचारांमध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक असून शासनामार्फत उपलब्ध मोफत उपचार सुविधांचा लाभ घ्यावा.”
क्लबफूट दिन (World Clubfoot Day) हा समाजामध्ये या विकृतीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पालकांना वेळेवर उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. आरोग्य विभाग, फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी आणि भागीदार संस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक मुलांना चालणे, धावणे आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक मदत मिळत आहे.
क्लबफूट (World Clubfoot Day) ही जन्मजात विकृती असून यामध्ये बाळाचे एक किंवा दोन्ही पाय जन्मतः आत वळलेले असतात. अंदाजे प्रत्येक 800 नवजात बाळांपैकी 1 बाळामध्ये ही समस्या आढळते. मात्र योग्य वेळी उपचार मिळाल्यास ही मुले सामान्य व सक्रिय जीवन जगू शकतात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) मार्फत क्लबफूट असलेल्या मुलांची लवकर ओळख करून त्यांना उपचारासाठी संदर्भित केले जाते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), खापरी, नागपूर येथे क्लबफूट उपचार सेवा उपलब्ध असून प्रभावित मुलांसाठी नियमित साप्ताहिक क्लिनिकचे आयोजन केले जाते.
जिल्हास्तरीय प्रगती:
48 मुले सध्या ब्रेसिंग उपचार घेत आहेत.
2 मुले सध्या प्लास्टर उपचाराखाली आहेत.
आशा व एएनएम यांसारखे फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी मुलांची लवकर ओळख करून त्यांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच उपचार नियमित सुरू राहावेत आणि फॉलो-अप पूर्ण व्हावा यासाठी पालकांचे सातत्याने समुपदेशन केले जात आहे. Anushkaa Foundation for Eliminating Clubfoot यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालये व उपचार केंद्रांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर, आवश्यक साहित्य व प्रभावी फॉलो-अप प्रणालीच्या माध्यमातून दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.