मुनीर पटेल
मुनीर पटेल यांच्या शिवसेना प्रवेशाने तत्वनिष्ठ राजकारणाचा गळून पडला मुखवटा
Munir Patel: पदासाठी आयुष्यभर तत्व शून्य राजकारण करणार नाही अशा मोठमोठ्या बाता मारणाऱ्या मुनीर पटेल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने तत्वनिष्ठ राजकारणाचा मुनीर पटेल
Munir Patel |
पदाच्या लालसेपायी पाच वेळा पक्षांतर
हिंगोली (Munir Patel) : पदासाठी आयुष्यभर तत्व शून्य राजकारण करणार नाही अशा मोठमोठ्या बाता मारणाऱ्या मुनीर पटेल यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने तत्वनिष्ठ राजकारणाचा मुनीर पटेल (Munir Patel) यांचा मुखवटा गळून पडला आहे. माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्या छुप्या सहकार्याने जिल्हा परिषदेचे सभापती पद मिळाले होते त्या डॉ मुंदडा यांच्यासोबत उघडपणे मांडीला मांडी लावून बसण्याचे ' सौभाग्य" आता मुनीर पटेल यांना मिळणार आहे.
राजकारणाची सुरुवात काँग्रेस मधून केल्यानंतर 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मुनीर पटेल हे सुद्धा त्यांच्या पक्षातच गेले. मात्र स्थानिक राजकारणात त्यावेळेस आमदारकी जयप्रकाश मुंदडा यांच्याकडे असल्यामुळे त्यांचे अंधारात बोट धरून चालण्याचा प्रवास जगजाहीर आहे. सन 2000 मध्ये ग्रामपंचायत मध्ये अलका लाहोटी यांच्याकडे सरपंच पद देण्याच्या बदल्यात जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती पद त्यांनी पदरात पाडून घेतले व तत्कालीन बाराशिव सहकारी साखर कारखान्यात तज्ञ संचालक पदी नियुक्ती करवून घेतली. जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे पाच वर्षे मंत्रीपद व दहा वर्षे आमदारकी असताना मुनीर पटेल यांना जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य पदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या संधीचा उपयोग गावाला किती झाला यापेक्षा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग तीन वेळेस जिल्हाध्यक्ष पद मिळण्यासाठी झाला.
वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये वीस ते पंचवीस हजार मतदार बाळगून असलेल्या मुनीर पटेल (Munir Patel) यांच्या मनात आमदारकीची निवडणूक लढवण्याची भावना उचंबळून आल्याने त्यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेऊन विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपयश आल्याने पुढे त्यांनी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला. मात्र काँग्रेसमध्ये काम करताना नेतृत्वाची सैरभैर अवस्था पाहून पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्ष पद मिळाले. यानंतर त्यांनी अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांचे कार्यकर्ते खाजगीत बोलत असतात. मात्र हा प्रवेश मिळाला नाही त्यामुळे कोणत्या पक्षात प्रवेश करावा यासाठी त्यांच्या मनात घालमेल सुरू होती.
शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांना प्रवेश मिळाल्याने पाच वेळा पक्षांतर करण्याचे त्यांचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. आयुष्यभर पैसा आणि पदासाठी तत्व शून्य राजकारण करणार नाही अशा बढाया मारणाऱ्या मुनीर पटेल यांच्या पुन्हा जिल्हा परिषद काबीज करण्याच्या मनसुब्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुनीर पटेल (Munir Patel) यांच्यामुळेच ग्रामपंचायत मध्ये पद मिळू शकते असा विश्वास असणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी सुद्धा प्रवेश मिळवला असला तरी एकेकाळी मुनीर पटेल यांना तगडी टक्कर देण्यासाठी राजकारणातील महत्त्वाचे पद भूषवलेल्या नेत्याने सुद्धा मुनीर पटेल यांच्यासोबतच प्रवेश घेतला हे जनतेला रुचलेले दिसत नाही .