Panditdada Deshmukh : नगराधीक्षक पंडितदादा देशमुख यांनी व्यंकटेश नगर मध्ये तात्काळ कार्यान्वयन करून महिलांना बॉयलरवेल चालवली, तसेच विद्युत पंपांचा समर्थन केला. पाण्याच्या अभावामुळे त्रस्त
चिखली (Panditdada Deshmukh ) : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील व्यंकटेश नगर परिसरात अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांनी तातडीने उपाययोजना करत नागरिकांना दिलासा दिला आहे. परिसरातील महिलांनी व नागरिकांनी बोअरवेलची मागणी केल्यानंतर नगराध्यक्ष देशमुख यांनी प्रशासनाला तत्काळ निर्देश देत बोअरवेल खोदकामासह विद्युत पंपाची व्यवस्था करून दिली. विशेष म्हणजे या बोअरवेलला मुबलक पाणी लागल्याने परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे.
दिनांक ११ जून २०२६ रोजी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख (Panditdada Deshmukh) यांच्या हस्ते नव्या बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक मोहित व्यवहारे, नगरसेविका अश्विनी विश्वनाथ जाधव, सिद्धू ठेंग, श्याम वाकतकर, चिखली आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मे महिना संपून जून महिना सुरू झाला असतानाही पावसाने हजेरी न लावल्याने काही ठिकाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेअशा परिस्थितीत व्यंकटेश नगरमधील महिलांनी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली. नागरिकांच्या अडचणीची गांभीर्याने दखल घेत देशमुख यांनी कोणतीही दिरंगाई न करता प्रशासनाच्या माध्यमातून काही दिवसांतच बोअरवेल कार्यान्वित करून दिली.
नागरिकांच्या गरजा ओळखून तात्काळ निर्णय घेण्याची कार्यपद्धती आणि विकासकामांप्रती असलेली बांधिलकी यामुळे पंडितदादा देशमुख यांच्याविषयी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बोअरवेल सुरू झाल्यानंतर परिसरातील महिलांनी हार व औक्षण करून नगराध्यक्षांचे स्वागत केले तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
व्यंकटेश नगरमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी घेतलेल्या या त्वरित निर्णयामुळे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन केले जात आहे.