Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > मुंबई

विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरू

University of Mumbai ने 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी पदवी (UG) प्रवेश प्रक्रिया 6 मे 2026 पासून सुरू केली आहे.


विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरू

Mumbai University |

मुंबई (Mumbai University) : University of Mumbai ने 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी पदवी (UG) प्रवेश प्रक्रिया 6 मे 2026 पासून सुरू केली आहे. नोंदणीची अंतिम मुदत 21 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. पहिली गुणवत्ता यादी (Merit List) 26 मे रोजी जाहीर होणार असून त्यानंतर तीन दिवस दस्तऐवज पडताळणी आणि शुल्क भरण्याची मुदत दिली जाईल.

तिसरी गुणवत्ता यादी 4 जूनपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, तर अंतिम प्रवेश प्रक्रिया 9 जूनपर्यंत पूर्ण केली जाईल. नव्या शैक्षणिक सत्राच्या वर्गांना 13 जून 2026 पासून सुरुवात होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदारांनी खालील कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे:

  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • इयत्ता 12वी गुणपत्रिका
  • आरक्षण (कॅटेगरी) प्रमाणपत्र (लागू असल्यास)

आरक्षणाची टक्केवारी (Reservation Matrix)

मुंबई विद्यापीठ सरकारच्या नियमांनुसार आरक्षण प्रणाली लागू करत आहे:

  • अनुसूचित जाती (SC): 13%
  • अनुसूचित जमाती (ST): 7%
  • इतर मागासवर्गीय (OBC): 19%
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): 10%
  • सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC): 10%
  • याशिवाय भटक्या (NT) आणि विमुक्त (DT) जमातींसाठीही स्वतंत्र कोटा आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया (Steps to Apply)

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: muugadmission.samarth.edu.in

  • नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर वापरून खाते तयार करा

  • वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करा

  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • आवडीचे कोर्स आणि महाविद्यालये निवडा (कट-ऑफ लक्षात घेऊन)

  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासा

  • काही महाविद्यालयांची स्वतंत्र प्रक्रिया असू शकते

  • निवड झाल्यास संबंधित महाविद्यालयात जाऊन शुल्क भरा

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळ तपासत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.