Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखलीत घरफोडी प्रकरण

चिखलीत घरफोडी करणारा 'मोक्का'तील कुख्यात आरोपी गजाआड; चिखली पोलिसांची धडक कारवाई

Chikhali Burglary Case: श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या एका वयोवृद्धाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या एका कुख्यात अट्टल चोराला चिखली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली


चिखलीत घरफोडी करणारा मोक्कातील कुख्यात आरोपी गजाआड चिखली पोलिसांची धडक कारवाई

Chikhali Burglary Case |

 

स्थानिक गुन्हे शोध पथकाने (D.B. Team) नेवासा येथून ठोकल्या मुसक्या; चोरीचा ऐवज हस्तगत

चिखली (Chikhali Burglary Case) : येथील श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या एका वयोवृद्धाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या एका कुख्यात अट्टल चोराला चिखली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. डीचेन त्र्यंबक भोसले (वय ४८, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक जिल्ह्यांत घरफोडी व दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झालेली आहे.

​घराचे कुलूप तोडून ७२ हजारांचा मुद्देमाल लांबवला

श्रीकृष्णनगर येथील रहिवासी रघुनाथ जगन्नाथ कंगले (वय ६९) हे २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुलाकडे गेले होते. २ ऑगस्ट रोजी घरी परत आले असता त्यांना घराच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, मणी, २५ चांदीची नाणी, चांदीचा शिक्का आणि रोख १२,००० रुपये असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहिल्यानगर जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या

ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्तबातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथून संशयित डीचेन भोसले याला ताब्यात घेतले. खाकीचा दणका मिळताच आणि पीसीआर दरम्यान कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही (Chikhali Burglary Case) धडक कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. प्रवीण मोरे, म.पो.उप.नि. अश्विनी गाडे, तपास अंमलदार पो.हे.का. कैलास चतरकर, पो.का. सुधाकर पाडळे तसेच डी.बी. पथकाचे अमोल गवई, ललिता खरात, निलेश सावळे, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर इंगळे आणि रूपाली उगले यांनी केली आहे.

Related to this topic: