Parbhani Municipal Protest: थकीत वेतन आणि जीएसटी अनुदान फरकाची रक्कम मिळावी, यासाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिकेतील कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. शासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष
थकीत वेतन, जीएसटी अनुदान फरकाच्या रक्कमेसाठी मनपा कर्मचार्यांचे कामबंद सुरूच..?
परभणी (Parbhani Municipal Protest) : थकीत वेतन आणि जीएसटी अनुदान फरकाची रक्कम मिळावी, यासाठी सोमवार १० ऑगस्ट पासून महापालिकेतील कर्मचारी कामबंद आंदोलनावर आहेत. शासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने संघटनेकडून १८ ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात शासनाला सोमवार १७ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले आहे.
महापालिका कर्मचार्यांचे मागील पाच महिन्याचे वेतन थकले आहे. तसेच जीएसटी अनुदान फरकाची रक्कमही मिळाली नाही. यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने सेमवार १० ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. (Parbhani Municipal Protest) आंदोलनालात भिक मांगो, मुंडण, पिंडदान करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही संघटनेने आंदोलनाची भूमिका आणखी तीव्र केली असून १८ ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.