Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अतिदुर्गम पिंप्री लिंगच्या तरुणाची ''सहाय्यक प्रकल्प अधिकारी''पदी मोठी झेप

माणसाकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे सेनगाव तालुक्यातील पिंप्री लिंग येथील रविकुमार सुधाकर खिल्लारे यांनी सिद्ध केले आहे.


अतिदुर्गम पिंप्री लिंगच्या तरुणाची सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी मोठी झेप

MPSC Success Story |

जिद्दीचा 'रवि' तळपला !

सेनगाव : माणसाकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे सेनगाव तालुक्यातील पिंप्री लिंग येथील रविकुमार सुधाकर खिल्लारे यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या २०२४ च्या परीक्षेत त्यांची 'सहाय्यक प्रकल्प अधिकारी' (Assistant Project Officer) या वर्ग-२ च्या पदावर निवड झाली असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सेनगाव तालुक्यातील अतिदुर्गम मानल्या जाणाऱ्या पिंप्री लिंग या छोट्याशा खेड्यात रविकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण आडोळ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी परभणी गाठले आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी पूर्ण केली. 

ग्रामीण भागातील तुटपुंजी साधने आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते.

रविकुमार खिल्लारे यांचा स्पर्धा परीक्षेतील प्रवास थक्क करणारा आहे. २०१७ च्या बॅचमध्ये त्यांनी पीएसआय (PSI), एसटीआय (STI) आणि एएसओ (ASO) अशा तीनही पदांवर एकाच वेळी यश मिळवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून एक वर्ष सेवा बजावली. पुढे त्यांची निवड राज्य कर निरीक्षक (STI) पदी झाली, जिथे त्यांनी मुंबई व नांदेड येथे प्रामाणिकपणे सेवा दिली.

सरकारी नोकरीत कार्यरत असतानाही 'गॅझेटेड' अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. कर्तव्यावर असताना मिळेल त्या वेळेत त्यांनी अभ्यासाचे सातत्य राखले. अनेक चढ-उतार आणि अपयशांचा सामना करत त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर २०२४ च्या निकालात त्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदाला गवसणी घालून आपल्या कष्टाचे चीज केले आहे.

रविकुमार यांच्या या उत्तुंग यशाबद्दल पिंप्री लिंग गावासह संपूर्ण सेनगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हा प्रवास एक प्रेरणादायी ठरणार आहे.

Related to this topic: