Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

मुलीच्या साखरपुड्याआधीच आईने प्रियकराशी केले लग्न; जामनेरमधील घटनेने कुटुंब हादरले

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कुटुंबात घडलेल्या अनपेक्षित घटनेने परिसरात चर्चांना उधाण आले आहे.


मुलीच्या साखरपुड्याआधीच आईने प्रियकराशी केले लग्न जामनेरमधील घटनेने कुटुंब हादरले

Mother Marries Boyfriend |

घरातून अचानक निघून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो; पतीची पोलिसांकडे धाव

जळगाव (Mother Marries Boyfriend) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कुटुंबात घडलेल्या अनपेक्षित घटनेने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना तिच्या आईने स्वतःच्या प्रियकरासोबत विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून महिलेच्या पहिल्या पतीने याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

माहितीनुसार, जामनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या या कुटुंबात येत्या गुरुवारी मुलीचा साखरपुडा पार पडणार होता. कार्यक्रमाच्या तयारीसाठी घरात जोरदार हालचाली सुरू होत्या. नातेवाईकांची ये-जा वाढली होती आणि सर्वजण समारंभाच्या नियोजनात व्यस्त होते.

अशातच दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी विविध ठिकाणी प्रयत्न केले, मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी महिलेच्या प्रियकराने मोबाईल स्टेटसवर दोघांच्या विवाहाचे छायाचित्रे पोस्ट केली. हे फोटो पाहिल्यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. मुलीच्या साखरपुड्याच्या तयारीत असताना अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले.

पत्नीने प्रियकरासोबत विवाह केल्याचे सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यानंतर महिलेच्या पतीने थेट जामनेर पोलीस ठाणे गाठले. मुलीचा साखरपुडा काही दिवसांवर असताना या प्रकारामुळे समाजात आपली प्रतिमा मलिन होत असल्याची भावना त्याने पोलिसांसमोर व्यक्त केली. तसेच पत्नी आणि तिच्या प्रियकराने मोबाईलवरील लग्नासंदर्भातील स्टेटस हटवावे, अशी विनंतीही त्याने केली.

पतीची तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळी त्याला आवश्यक समज देण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Related to this topic: