Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जवळा बाजार येथे मोबाईल टॉवर केबल चोरीचा डाव उधळला; चौघांना अटक

मोबाईल टॉवरच्या केबल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चौघा आरोपींना जवळा बाजार पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून या कारवाईत 95,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जवळा बाजार येथे मोबाईल टॉवर केबल चोरीचा डाव उधळला चौघांना अटक

Mobile tower cable theft |

जवळा बाजार (Mobile tower cable theft) : मोबाईल टॉवरच्या केबल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चौघा आरोपींना जवळा बाजार पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून या कारवाईत 95,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

1 जून रोजी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पोलिस चौकीचे जमादार इम्रान सिद्दिकी व पोलिस अंमलदार अंबादास बेले जवळा बाजार गावात गस्त घालत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आल्यानंतर काही इसम मोबाईल टॉवरवरील केबल चोरी करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून दोघांना जागीच ताब्यात घेतले, तर दोन आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पळून गेलेल्या साथीदारांचे मोबाईल नंबर मिळवून पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे वगरवाडी शिवारात शोध घेतला. तेथून फरार झालेल्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान चौघांनीही जवळा बाजार येथील मोबाईल टॉवरची केबल चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी तीन मोबाईल, कटर, पाना, स्क्रू ड्रायव्हर, एक मोटरसायकल व दोन लोखंडी गज असा एकूण 95,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जमादार इम्रान सिद्दिकी यांच्या तक्रारीवरून मुजाहिद उर्फ मुज्जू शेख सादिक, सय्यद रहमान सय्यद इफ्तिकार, शेख मतीन शेख मोबीन (सर्व रा. मस्तानशा नगर, हिंगोली) तसेच प्रथमेश उर्फ बल्ला दिलीप काशिदे (रा. बावनखोली, हिंगोली) या चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, पोलिस जमादार इम्रान सिद्दिकी व अंबादास बेले यांनी ही कारवाई केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस जमादार दिलीप नाईक करीत आहेत.

पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

Related to this topic: