Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

हराळ येथील युवक अकोला येथे बेपत्ता; परिवार व अकोला पोलीस घेत आहेत शोध

रिसोड तालुक्यातील हराळ येथील 32 वर्षीय युवक अकोला येथे आपल्या आई व भाऊसोबत उपचारासाठी गेलेला असताना बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.


हराळ येथील युवक अकोला येथे बेपत्ता परिवार व अकोला पोलीस घेत आहेत शोध

Missing Person |

रिसोड (Missing Person) : रिसोड तालुक्यातील हराळ येथील 32 वर्षीय युवक अकोला येथे आपल्या आई व भाऊसोबत उपचारासाठी गेलेला असताना बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी घडली असून, परिवाराकडून अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मात्र आज (1 मे) पर्यंत त्याचा कोणत्याही प्रकारचा पत्ता लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. सोपान धोंडूबा खाडे उर्फ बंडू (वय 32 वर्षे) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोपान उर्फ बंडू हा दिनांक 27 एप्रिल रोजी आपल्या आई व भावासोबत अकोल्यातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तो दवाखान्याबाहेर आला व तेथून निघून गेला. त्यानंतर तो परत न आल्याने आई व भावाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीही ठावठिकाणा लागला नाही.

सोपान उर्फ बंडू हा शेतमजूर असून, शेतात काम करत असताना त्याच्या डोक्याला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या फाल्क्याचा फटका बसला होता. त्या अपघातानंतर त्याची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले जाते. डोक्याला मार लागल्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाल्याचे हराळ येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अकोला पोलीस आणि कुटुंबीयांकडून त्याचा शोध सुरू असून, नागरिकांनी संबंधित युवकाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: