Hingoli earthquake shock: हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का ३.५ रिश्टर स्केलवर दर्जा पावला. भूकंपाचे केंद्रबिंदू माळधामणी येथे होते. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (Hingoli earthquake shock) : काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, या घटनेची नोंद भूकंप मापन केंद्रामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेची झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. हा भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील माळधामणी येथील असल्याची माहिती प्राप्त झाली. जिल्हा प्रशासनामार्फत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (Hingoli earthquake shock) नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच कोणतीही आपत्कालीन माहिती प्राप्त झाल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.