Hingoli Health Department Recruitment: आरोग्य विभागातील १८ जूनपासून सुरू झालेल्या वैद्यकीय शिकषण पदांच्या भरती प्रक्रियेत मजूर क्रमचारिकांना सध्या १५० जागा रिक्त असल्यामुळे संशोधन मंत्री हसन मुर्शीफ
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य विभाग कामगार-कर्मचारी शाखेने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले निवेदन
हिंगोली (Hingoli Health Department Recruitment) : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामार्फत जून 2025 मध्ये जाहीर झालेल्या विविध संवर्गातील 1058 पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आरोग्य विभाग कामगार- कर्मचारी शाखेने यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे.
18 जून 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 18 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान सरळसेवा परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर 05 डिसेंबर व 11 डिसेंबर 2025 रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. 13 डिसेंबर 2025 व 19 जानेवारी 2026 रोजी तात्पुरती निवड यादी लावून 02 फेब्रुवारी ते 25 मार्च 2026 दरम्यान उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाली. 25 फेब्रुवारी व 02 मार्च 2026 रोजी पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या.
मात्र, माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या 15% जागांसाठी पात्र उमेदवार न मिळाल्याने सुमारे 150 जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा अत्यावश्यक सेवांशी संबंधित असल्याने त्या तातडीने भरणे गरजेचे आहे, असे संघटनेने म्हटले आहे. (Hingoli Health Department Recruitment) शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशानुसार माजी सैनिकांसाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास त्या जागा तात्काळ इतर पात्र उमेदवारांमधून भरण्याची तरतूद आहे. तरीही आयुक्त कार्यालयाकडून वारंवार माजी सैनिक कल्याण मंडळ, पुणे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ना-हरकत प्रमाणपत्र मागितले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही पात्र उमेदवारांना नियुक्ती न मिळाल्याने संघटनेने तीन टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात 11 जून रोजी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 12 जून पासून सर्व आमदारांना टप्प्याटप्प्याने निवेदन देण्यात येत आहे. तर तिसऱ्या टप्प्यात 23 जून 2026 रोजी आझाद मैदान, मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षा पल्लवी चौधरी व प्रदेश महासचिव सुरेश गवई यांनी केली आहे.