डोळ्याच्या गंभीर विकाराने त्रस्त असलेल्या एजाज मोहम्मद अली खान या चिमुकल्याला आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
हिंगोली (Medical Help) : डोळ्याच्या गंभीर विकाराने त्रस्त असलेल्या एजाज मोहम्मद अली खान या चिमुकल्याला आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. चिमुकल्याच्या पुढील उपचारासाठी आवश्यक ती मदत करत उपचाराची व्यवस्था करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना मदत करण्याची भूमिका आ. संतोष बांगर सातत्याने पार पाडत असून, या मदतीमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रसंगी कुटुंबीयांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार मानले असून, चिमुकल्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.