Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

नगराध्यक्ष आश्लेषा चौधरी

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व स्वच्छतेची कामे पूर्ण करा: नगराध्यक्ष आश्लेषा चौधरी & आर. आर. पाटील

Mayor Ashlesha Chaudhary


पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व स्वच्छतेची कामे पूर्ण करा नगराध्यक्ष आश्लेषा चौधरी  आर आर पाटील

Mayor Ashlesha Chaudhary |

कळमनुरी (Mayor Ashlesha Chaudhary) : शहरातील नालेसफाई व स्वच्छतेची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्ष आश्लेषा वैभव चौधरी व आर. आर. पाटील यांनी मुख्याधिकारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. १ जूनपूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाले व परिसर स्वच्छ करण्याचे नियोजन करण्याचे सूचना ही देण्यात आले.

कळमनुरी शहरातील विविध भागांमध्ये साचलेला कचरा, तुंबलेले नाले आणि अस्वच्छतेमुळे पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये बुडकी नाला, भाजी मंडई परिसरातील नाला, मोठा मारुती परिसर, नुरी मोहल्ला, आठवडी बाजार, मुरलीधर मंदिर परिसर, मुख्य रस्ता, पोस्ट ऑफिस परिसर, बाजारपेठ तसेच जुना पोलीस स्टेशन रोड आदी भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

आठवडाभरात संपूर्ण शहरातील नालेसफाई व कचरा निर्मूलनाची कामे पूर्ण करून पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आश्लेषा वैभव पाटील (Mayor Ashlesha Chaudhary) यांनी केले आहे